आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Pankaja Munde News In Marathi, Parbhani, Nanded

केंद्रात जावे की राज्यात? गोपीनाथ मुंडे कन्या आमदार पंकजा यांचा संभ्रम कायम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पक्षाचे काम केंद्रात करावे की राज्यात, याबाबत भाजपच्या आमदार व भाजयुमोर्च्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे- पालवे यांचा संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसते. ‘केंद्रात गेले तरी राज्यात लक्ष ठेवावेच लागते. पक्षाने केंद्रात पाचारण केले असले तरी तूर्त तरी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे केंद्र की राज्य याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ’, असे पंकजा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. आपल्या संघर्ष यात्रेला सुरूवात करण्यापूर्वी बुधवारी औरंगाबादेत दिव्य मराठी’शी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपला संभ्रम आता दूर झाल्याचे सांगत, यापुढे राज्यातच राजकारण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ दोन दिवसांत त्यांनी पुन्हा ‘योग्य वेळी निर्णय घेऊ,’ असे गोलगोल उत्तर देऊन आपल्या मनात संभ्रम कायम असल्याचे दाखवून दिले.

पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा गुरुवारी रात्री जिंतूर येथे दाखल झाली. त्यानंतर परभणीत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मुंडे साहेबांचे विकासाचे अधुरे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. केले. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्याचे नाटक करण्याऐवजी सरकारने सरसकट पॅकेज जाहीर करावे.’
‘अनुकंपा तत्त्वावर नको, कर्तृत्वावर हवे मंत्रिपद
मला अनुकंपा तत्त्वावर मंत्रिपद नकोय, माझ्या कर्तृत्वावर मी ते मिळवीन,’ असा आत्मविश्वास आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी शुक्रवारी कंधारच्या सभेत व्यक्त केला.

मुंडे यांची संघर्ष यांचा शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात पोहोचली. कंधार येथील सभेत त्या म्हणाल्या, सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी यांचे राज्य यावे, मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी संघर्ष सुरु केला. जनताच माझी संपत्ती आहे. ती सांभाळणे माझे कर्तव्य आहे. सत्ता परिवर्तनासाठी हा संघर्ष आहे.जिवंतपणी ज्या लोकांनी मुंडे साहेबांना त्रास दिला त्यांच्या मार्गाने जाऊ नका. लोकनेत्याचा वारसा चालविण्यासाठी मी माझे संपूर्ण जीवन खर्ची घालण्याचा संकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले.

शेकापचे जनेते केशवराव धोंडगे यांचे पूत्र मुक्तेश्वरे, प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी खारीक-खोबऱ्याचा हार घालून पंकजा यांचे स्वागत केले. या सभेला मनोहर धोंडे वगळता शिवसेनेचे सर्व नेते गैरहजर राहिले. नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले प्रताप चिखलीकरही आपल्या मतदारसंघातील सभेला दांडी मारली.