आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'महावितरण\'च्‍या अधिका-यांना धक्‍काबुक्की पडली महाग, सेनेच्या आमदाराला शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शिवसेनेचे परभणीतील आमदार संजय जाधव यांना 'महावितरण'च्‍या अधिका-यांना धक्‍काबुक्की केल्‍याप्रकरणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयाने 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठवला आहे.

शासकीय कामात अडथळा आणण्‍याच्‍या गुन्‍ह्यात जाधव यांना शिक्षा झाली आहे. 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांसोबत तीन महिन्यांपूर्वी जाधव यांनी वाद घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. त्यावर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जाधव हे शेतकऱ्यांसोबत 'महावितरण'च्‍या कार्यालयात गेले होते. तेथे अभियंत्यासोबत त्‍यांचा वाद झाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. तशी तक्रार अधिका-यांनी दाखल केली होती. त्‍यानंतर जाधव यांच्‍यावर शासकीय कामकाजात अडथळे निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची झटपट सुनावणी होऊन जाधव यांना शिक्षा सुनावण्यात आली. एखाद्या आमदाराला झटपट शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.