आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Sitaram Ghantat Arrested For Distributing Money To Voters, Divya Marathi

मतदारांनापैसे वाटप केल्याप्रकरणी आमदार सीताराम घनदाट यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मतदारांनापैसे वाटप केल्याप्रकरणी गंगाखेडचे अपक्ष उमेदवार आमदार सीताराम घनदाट भाजप-रासप महायुतीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना रविवारी अटक करण्यात आली. नंतर जामिनावर त्यांची सुटकाही झाली.

कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर या दोघांचा प्रक्रियेत अप्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. तांदुळवाडी येथे गुरुवारी पैसे वाटप करणारा भरारी पथक पाहून २७ हजार सोडून पळून गेला होता. याप्रकरणी पोलिस व्यंकट मुंडे यांच्या तक्रारीवरून पालम ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चार जणांच्या अटकेनंतर घनदाट यांचे नाव आले होते.

यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही. एन. जटाळे यांच्या पथकाने रविवारी आमदार सीताराम घनदाट यांना दुपारी दोन वाजता अटक केली. त्यांच्या घराचीही झडती या पोलिस पथकाने सर्च वॉरंटद्वारे घेतली आहे.

रत्नाकर गुट्टेंनाही अटक
गंगाखेड तालुक्यातील खळी येथे कपबशी या चिन्हाच्या उमेदवाराकडून गावामधील मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करत आत्माराम उत्तमराव जाधव इतर दोघा जणांना शनिवारी (दि. चार) रात्री अटक करण्यात आली. या तिघांनी स्काॅर्पियोतून (एमएच ४४ - जी ७५५५) आणलेले एक लाख ८७ हजार ४५० रुपये पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कपबशी हे चिन्ह रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचे असल्याने त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने अटक केली. त्यांच्या साखर कारखान्याचीही झाडाझडती घेण्यात आली.

लक्ष्मीअस्त्रासाठी गंगाखेड प्रसिद्ध
गंगाखेड मतदारसंघ लक्ष्मीअस्त्रासाठी मागील दोन निवडणुकांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. कागदोपत्री वा प्रत्यक्ष पुरावे जरी नसले, तरी पैसे वाटप करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. पैशांचे बेसुमार वाटप केले जाते. या वेळच्या निवडणुकीत तर आमदार सीताराम घनदाट यांच्या बरोबरीने या प्रकारात रासपचे उमेदवार गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे हेही निवडणूक रिंगणात असल्याने पैसे वाटपाचे प्रकार वाढणार हे अपेक्षितच होते. आगामी दिवसांत ही लक्ष्मीपुत्रांची लढाई अधिकच चुरशीची ठरेल.