आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mns Activist Gift Snake To Jalna Municipal Commissioner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे अनोखे आंदोलन, आयुक्तांना दिला साप भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - रस्ते, वीज या नागरी सुविधांअभावी शहरातील मळवटी रोड परिसरात दलदल झाल्यामुळे या भागात सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महापालिकेला कळवूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारात बुधवारी मनपा आयुक्तांना चक्क साप भेट दिला. या अनोख्या आंदोलनाची दिवसभरात चर्चा होती.

मळवटी रोड परिसर हा शहरालगत असून तेथे मोठी वस्ती आहे. तथापि वीज, रस्ते, कचरा उचलण्याची व्यवस्था तेथे नाही. नाल्यांअभावी सांडपाणी व पावसाचे पाणी उघड्यावर साचते. त्यामुळे दलदल झाली असून दुर्गंधी पसरली आहे. दलदलीमुळे गवत वाढले असून तेथे मोठ्या प्रमाणात साप निघत आहेत. यात नाग अधिक असल्याने नागरिक धास्तावले आहेत. रस्ते, वीज व कचरा व्यवस्थापन केल्यास हे संकट दूर होईल त्यामुळे या सुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेक वेळा केली होती. या प्रश्नाचे गांभीर्य दाखवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथील नागरिकांना एकत्र केले आयुक्तांच्या दालनात जाऊन साप असलेली बरणी त्यांना भेट देऊन तेथील वास्तव त्यांनी मांडले. यावर आयुक्तांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांना आश्वासन दिले.