आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MNS Declare Candidates For Assembly Election, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेच्या उमेदवारीने चुरस वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मनसेने जालन्यातून रवी राऊत, घनसावंगीमधून सुनील आर्दड, बदनापूरमधून ज्ञानेश्वर माउली गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोकरदनमधून दिलीप वाघ, तर परतूरमधून बाबासाहेब आकात यांना उमेदवारी दिली आहे.
लातूर । मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औसा मतदारसंघातून मनसेने बालाजी गिरे यांना उमेदवारी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.
नांदेड | मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार (नांदेड दक्षिण), अॅड. दिलीप ठाकूर (नांदेड उत्तर), रोहिदास चव्हाण (लोहा), माधव जाधव वडगावकर (भोकर) व धनलाल पवार (किनवट) यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर केली.
बीड । जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघांमधून पाच उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज आणि आष्टी या पाच विधानसभा मतदारसंघांमधून मनसे उमेदवार मैदानात उतरवणार आहे.
परभणी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परभणीतील चारपैकी तीन मतदारसंघांत नव्या चेह-यांना प्रथमच संधी दिली आहे. त्यात गंगाखेडात बालाजी देसाई, पाथरीत हरिभाऊ लहाने, तर जिंतुरात खंडेराव आघाव यांचा समावेश आहे.
हिंगोली | कळमनुरी आणि हिंगोली या दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. हिंगोलीत ओमप्रकाश कोटकर, तर कळमनुरीत सुनील अडकिणे यांना उमेदवारी मिळाली आहे. ओमप्रकाश कोटकर बळीराम पाटील कोटकर यांचे नातू आहेत.