आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे म‍हावितरणाविरोधी कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - दुष्काळी परिस्थितीत खंडित वीजपुरवठ्यामुळे बेजार असलेल्या नागरिकांना चुकीच्या तसेच भरमसाट बिलाचा बोजा सहन करावा लागत असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. यामुळे महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी परंडा कार्यालयात धुडगूस घालून सहायक अभियंत्यास धक्काबुक्की केली. दुसरीकडे खामगाव (ता. उस्मानाबाद) येथे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या लाइनमनला मारहाण करून डांबले
परंड्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुदीप ऊर्फ बाळू मोरे, राजू काळे, मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्षा मीना पाटील, राखी कोळी, यांच्यासह 15 कार्यकर्ते ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित का केला, असे म्हणत दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी सहायक अभियंत्यांच्या कक्षात घुसून एस. एन. मिसाळ यांना धक्काबुक्की करत तेथील खुर्च्या व शासकीय फायली अस्ताव्यस्त फेकून दिल्या.

पूर्वसूचना न देता आंदोलन
मनसे पदाधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता कक्षात घुसले. फर्निचरची मोडतोड करून शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बिल भरणा केल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत होईल.' एस. एन. मिसाळ, सहायक अभियंता
पाण्यासाठी हाल
ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनसे स्टाइल आंदोलन केले.
सुदीप मोरे, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे
दुष्काळात जखमेवर मीठ

जिल्ह्यात 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. अशा स्थितीत शासन मदत देण्याऐवजी वीज तोडून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहे. यामुळे सर्वत्र शेतकरी पेटून उठत आहे. आता तरी शासनाने डोळे उघडण्याची गरज आहे. यापुढेही वीज तोडणे सुरू राहिले तर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे.'
मुजीब पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना

वरिष्ठांच्या आदेशावरून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम थांबवण्याबाबत काहीच आदेश नाहीत. यामुळे यापुढेही मोहीम सुरू राहील.'
श्रीयश कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता