आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल बॅटरीच्‍या स्फोटात तरुण जखमी; लातूर येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर – रस्‍त्‍यात सापडलेला वायर मोबाइलच्‍या बॅटरीला जोडण्‍याचा प्रयोग रेणापूर तालुक्यातील नागापूर येथील नवनाथ दिलीप जाधव (३०) या युवकाच्‍या जीवावर बेतणारा ठरला. या नस्‍त्‍या उठाठेवीमुळे मोबाइल बॅटरीचा स्‍फोट होऊन नवनाथ हा जखमी झाला आहे. या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथला पांढ ऱ्या रंगाची वायर जोडलेली एक कांडी सापडली होती. त्याने नवीन एखादा प्रयोग करण्‍यासाठी ती कांडी उत्सूकतपोटी मोबाइलच्या बॅटरीला जोडली. त्यामुळे स्फोट झाला. यात तो जखमी झाला. कांडीतून छर्ररे निघाल्याने ते त्याच्या हातापायात घुसले. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर लातूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
त्‍या कांडीत स्‍फोटक पदार्थ
नवनाथला सापडलेल्या कांडीमध्ये स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, तीत डेटोनेटर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याला ही कांडी नेमके कोठे सापडली याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी गावचे पोलिस पाटील शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवी जिवाला धोका होईल, अशा पद्धतीने वायर जोडलेली कांडी बाळगल्याप्रकरणी नवनाथवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. वाघमारे यांनी दिली.