आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Deal With American Pharmacutical Companies Rahu Gandhi's L Allegation

अमेरिकन औषध कंपन्यांशी मोदींचे ‘डील', राहुल गांधी यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अमेरिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी काही अमेरिकी औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यांनी सांगितल्यावरून मोदींनी औषधांचे दर नियंत्रणमुक्त केले. त्यामुळे ८ हजारांना मिळणा-या कॅन्सरच्या औषधाची किंमत एक लाखापर्यंत गेली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी औसा येथे केला.

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल यांची सभा झाली. ते म्हणाले, राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेद्वारे ६ लाख लोकांचे प्राण वाचवले. अमेरिकी कंपन्यांच्या सांगण्यावरून मोदींनी औषध दरांचे नियंत्रण उठवले. त्यामुळे मधुमेह, कॅन्सरची औषधे महागली आहेत.

पंतप्रधान झाल्यास पाक-चीनला धडा शिकवू, अशी भाषा मोदी लोकसभेच्या वेळी करत होते. पाकिस्तान गोळीबार करत आहे. सभेत म्हणणं सोपं आहे, पण करणं अवघड आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

आश्वासनांची जंत्री...
* जीवनदायीची मर्यादा २.५ लाख, औषधे मोफत, ३० लाखांना रोजगार.
* शेतक-यांना २४ तास वीज, घरकुल बांधकामासाठी २.५ लाखांची मदत.

महाराष्ट्रच सरस
मोदींच्या गुजरात मॉडेलपेक्षा महाराष्ट्र सरस आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे मार्केटिंग कमी पडले. त्यांनी मात्र मार्केटिंग करून पैसा चालवला, असे राहुल यांनी म्हटले.

लोकांवरच प्रश्नचिन्ह
आमचे विरोधक म्हणतात की गेल्या ६० वर्षांत आम्ही काहीच केले नाही. पण ६० वर्षांमध्ये देशात ज्या नव्या गोष्टी झाल्या त्या सामान्य जनतेच्या कष्टातूनच झाल्या आहेत. त्यामुळे काहीच झाले नाही, असे म्हणणे म्हणजे हे आमच्यावर प्रश्नचिन्ह नाही, तर ते सामान्य जनतेच्या कष्टावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यासारखे आहे, असे प्रत्युत्तर राहुल यांनी दिले.
छायाचित्र: औसा येथील सभेत राहुल गांधी यांना तुळजाभवानीची प्रतिमा भेट देण्यात आली.