आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Put Foundation Stone For Shivaji Memorial

शिवस्मारकाचे भूमिपूजन माेदींच्या हस्ते हाेणार, विनायक मेटे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - अारबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारणीचे काम युतीच्या सरकारने हाती घेतले अाहे. कामाच्या प्रारंभाच्या दाेन तारखा निश्चित केल्या. परंतु अडचणींमुळे रद्द करण्यात अाल्या. दिवाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते भूमिपूजन हाेऊन कामास प्रारंभ हाेईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे प्रमुख तथा अामदार विनायक मेटे यांनी दिली.
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी शनिवारी अामदार मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गाेरे, नगरसेवक शिवाजी जाधव, सुभाष सपकाळ, जयसिंग चुंगडे, शिवाजी कवठेकर, सुहास पाटील उपस्थित हाेते. अामदार मेटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभाण्यासाठी अावश्यक त्या परवानगी मिळत नव्हत्या. मात्र युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष देत शिवस्मारकासाठी परवानगी देण्यासाठी प्रयत्न केला. या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते करण्यासाठीचे निमंत्रण देण्यात अाले असून त्यांनी संमती दर्शवली अाहे. यामुळे दिवाळीदरम्यान स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू हाेण्यासाठी ज्या बाबी अावश्यक अाहेत त्या पूर्ण केल्या जातील. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन हाेताच कामांनाही प्रारंभ केला जाईल, असेही अामदार मेटे यांनी सांगितले.
नाेकरीमध्ये सवलतीची मागणी
राज्यातील मराठा समाजातील प्रत्येकाची अार्थिक सुबत्ता अाहेच असे काही नाही. त्यामुळे मराठा समाजालाही अारक्षण मिळावे यासाठी अाम्ही लढा उभारला. शासनाने याला मंजुरीही दिली. मात्र न्यायालयाच्या अादेशानुसार अारक्षण स्थगिती मिळाली. त्यापाठाेपाठ अारक्षण कायद्यालाही नुकतीच न्यायालयाने स्थगिती दिली. परिणामी राज्यातील मराठा सामाजातील बेराेजगारांपुढे पुन्हा संकटे निर्माण झाली अाहेत. ही दूर करण्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजातील मुला-मुलींना नाेकरीच्या संधी उपलब्ध हाेण्यासाठी अाेबीसी समाजातील तरुणांची नाेकरीसाठी असलेली वयाेमर्यादा लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे. याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे अामदार मेटे म्हणाले.
उडीद, पालिकेत गैरप्रकार
तत्कालीन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सत्तेचा दबाव अाणून उडीद घाेटाळा दडपवण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेप केला. या प्रकरणाचा पाठपुरावा केला असून यात जे दाेषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करूनच शांत बसू ,असेही अामदार मेटे यांनी स्पष्ट केले. तसेच बीड नगरपालिकेत सातशे काेटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरप्रकार केला असल्याने पालिका बरखास्त करण्यासाठी पुढील भूमिका असणार असेही,अामदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेते सांगितले.