आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सईदच्या सुटकेवर काँग्रेस टाळी का वाजवत आहे? मोदींची राहुल गांधींवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूज/जसदण/धारी- गुजरात निवडणूक प्रचारमोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेस व पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ले चढवले. ४ सभांत मोदींनी ‘अतिरेकी हाफिज सईदच्या सुटकेवर काँग्रेस टाळ्या का वाजवत आहे,’ असा प्रश्न विचारला.


हाफिज सईदच्या सुटकेनंतर राहुल यांनी मोदींबाबत ट्विट केले होते. त्यावर सोमवारी मोदी म्हणाले, पाकमध्ये कोर्टाच्या आदेशाने सईद सुटला. मात्र काँग्रेस यावर टाळ्या का वाजवत आहे? भारतीय जवान शून्यापेक्षा कमी तापमानात ७० दिवसांपर्यंत चिनी लष्कराशी डोळ्याला डोळा भिडवून उभे होते तेव्हा तुम्ही चिनी राजदूताची गळाभेट का घेत होता? हे कुणासाठी होते? उरी येथील अतिरेकी हल्ल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारले होते. मात्र गरिबांच्या घरात जेवणाचे नाटक करणारे सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ आणि फाेटो मागत होते. लष्कर चित्रपट बनवायला गेले होते का?

 

मी मोदी आहे; चहा विकेन, देश नाही
काही दिवसांपूर्वी यूथ काँग्रेसच्या ट्विटर खात्यावरून चहा विकल्याबद्दल मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. त्यावर मोदी म्हणाले, चहावाला त्यांना टक्कर देतोय, ही काँग्रेसची समस्या आहे. मी मोदी आहे, चहा विकेन मात्र देश नाही.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी महिला कमांडो...

 

हेही वाचा,

निवडणूक अाखाड्यासाेबतच अाकाशातही माेदी-राहुल लढत; 2 लाख पतंगांची पेच

बातम्या आणखी आहेत...