आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईलाही मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- पेठ बीड भागातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईलाही मारहाण करण्यात आल्याप्रकरणी पेठ बीड पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील पूरग्रस्त कॉलनी भागात १२ वर्षीय मुलीचा एका तरुणाने विनयभंग केला.
 
मुलीने ही माहिती आईला दिल्यानंतर आईने या तरुणाला जाब विचारला असता पाच ते सात जणांनी आईलाही लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी प्रमोद कानडे, मधुबाई कानडे, रोहित कानडे, गौतम कानडे, सोनाबाई कानडे, लताबाई कानडे, अनिल कानडे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...