आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या दोन मुलांसह महिलेची आत्महत्या, शिरूरअनंतपाळ तालुक्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे महिलेने पोटच्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती शिरूरअनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप यांनी दिली. संजीवनी गाडेकर (२७), छकुली गाडेकर (६) आणि राजवीर गाडेकर (४) अशी मृतांची नावे आहेत. संजीवनीने आपल्या राहत्या घरी अगोदर दोन्ही मुलांना गळफास दिला. त्यानंतर तिने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीवनीचा पती ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...