आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसा पावसा बरसण्याची कर घाई, माकडानेही घेतली मोठ्ठी जांभई...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावणात वरुणराजाने उस्मानाबाद जिल्ह्याकडे पाठ फिरवलीे. तुरळक श्रावणसरी बरसल्याने येडशीनजीकचा रामलिंग परिसर हिरवाईने नटून गेला आहे. मात्र, दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाची चिंता शेतकऱ्यांसह या माकडालाही असावी. त्यामुळेच की काय मोठ्ठी जांभई देत दुष्काळाचा अंदाज तर ते बांधत नसावे ना ?

पर्यटक वाढले
रामलिंगला नैसर्गिक वैभव लाभलेले आहे. दरीमध्ये प्राचीन रामलिंगच्या दर्शनासाठी मराठवाड्यासह सोलापूर, कर्नाटक भागातून भाविक येतात. या भागात घनदाट झाडी असून मोर, हरीण, ससे, माकडांचा सतत वावर असतो.

लीला कॅमेऱ्यात कैद   
पर्यटकांनी माकडांना शेंगदाणे दिल्याने ते मर्कटलीला दाखवतात. उस्मानाबादचे प्राध्यापक मनोज डोलारे यांनी एका माकडाच्या लीला कॅमेऱ्यात कैद केल्या. नदीमध्ये बाटली टाकून त्यात पाणी भरून एक माकड हे पाणी पीत होते. 
बातम्या आणखी आहेत...