आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात अॅट्राॅसिटीच्या हक्कासाठी महामोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अॅट्राॅसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून भीमसागर एकवटला. अायाेजकांच्या दाव्यानुसार तीन लाखांचा जनसमुदाय या माेर्चात सहभागी झाला. शहरासह जिल्हाभरातून दलितांसह साक्रीतील पिंपळनेर पट्टा तसेच शिरपुरातील आदिवासी वाड्या-पाड्यांतील अादिवासींनीही या माेर्चात सहभाग घेतला.
अॅट्राॅसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, खैरलांजी, कोपर्डी, सोलापूर येथील घटनांसह महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी दलित, आदिवासी अॅट्राॅसिटी कायदा संरक्षण समितीतर्फे शहरातून शनिवारी महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे एक टोक मुख्य सभामंचासमोर, तर दुसरे टोक मोर्चाला सुरुवात झाली त्या ठिकाणी होते. या मोर्चासाठी शहराच्या कानाकोपऱ्यात राहणारे भीमसैनिक एकवटले होते. तसेच साक्री व शिरपूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातून काही प्रमाणात आदिवासी बांधवांबरोबरच ग्रामीण भागातूनदेखील दलित, आदिवासी, ओबीसींचे जथ्थे मोर्चात एकवटले होते. सकाळी ९ वाजेला शहरात मोर्चेकऱ्यांच्या आगमनास सुरुवात झाली. शहराच्या चारही बाजूंनी मोर्चेकरी शहरात दाखल झाले. शहराच्या चारही बाजूंना मोर्चेकऱ्यांसाठी वाहनतळे निश्चित करण्यात आली होती. दुपारपर्यंत सर्व वाहनतळे वाहनांनी फुल्ल झाली होती. ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रकारे शहरातून निघालेल्या भीमसैनिकांच्या या मोर्चात तीन लाख भीमसैनिकांनी सहभाग नोंदविला. मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तरुणींनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सादर केले. दरम्यान, मोर्चातील शिस्तबद्धतेने एक नवा आदर्श निर्माण करून दिल्याची चर्चा शहरात होती.
बातम्या आणखी आहेत...