आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुदायिक विवाह साेहळ्यातून आतापर्यंत ११ काेटींची केली बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महेश सेवा संघाच्या वतीने २१ वा सामुदायिक विवाह साेहळा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर येथील वृंदावन गार्डनवर हाेत अाहे. दरवर्षी अखंडित व यशस्वी अायाेजनामुळे समाज सहभागातून सुमारे ११ काेटी रुपयांची बचत झाली अाहे.

खाेटी सामाजिक प्रतिष्ठा, चुकीचे रीतिरिवाज, अवाढव्य खर्चाला फाटा देत समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेश सेवा संघाने बीडमध्ये २० वर्षांपूर्वी सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ राेवली. साेहळ्यासाठी लागणाऱ्या निधीची उभारणी समाजातील सर्व स्तरांतील कुटुंबीयांकडून करण्यात येते. कुठलेही बंधन नसते. हा साेहळा लाेकसहभागाचे उत्तम उदाहरण बनल्याने समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत अाहे. महेश सेवा संघाचा प्रत्येक सदस्य वैयक्तिक कामांना दुय्यम स्थान देत साेहळ्याच्या अायाेजनात तन, मन, धनाने सहभागी हाेताे. त्यामुळे दाेन दिवसांचा वैवाहिक विधी व विवाह साेहळ्यात शेकडाे हात सहकार्यासाठी पुढे येतात. विवाह साेहळा हाेताच समाजापुढे खर्चाचा हिशेब ठेवला जातो. पारदर्शी व्यवहारामुळे समाजही महेश सेवा संघाच्या पाठीशी उभा राहिला अाहे. विधिपूर्वक शास्त्राेक्त पद्धतीने सामुदायिक स्वरूपात घरच्यासारखाच हा साेहळा माहेश्वरी परिवारासाठी महत्त्वाचा बनला अाहे.
लहानथाेर सामुदायिक विवाह म्हटले की सामान्यांचे लग्न असा समज रुजवण्याचा प्रयत्न हाेताे, परंतु महेश सेवा संघाने हा समज चुकीचा ठरवला अाहे. अार्थिक क्षमता ही विचारसरणी बाजूला ठेवून सामान्यांपासून ते ज्यांच्याकडे चार फाेन, वाहने अाहेत, अॉइल मिल, उद्याेग, व्यवसाय करतात अशा कुटुंबांनीही त्यांच्या मुला- मुलींचे विवाह या साेहळ्यात केले अाहेत.

अातापर्यंत १८५ जाेडप्यांचे विवाह
साधारण एका लग्नाला किमान तीन लाख रुपये खर्च येताे. अातापर्यंत १८५ जाेडप्यांचे लग्न झाले. ३७० वर-वधूंच्या लग्नाचा हिशेब केला तर हा अाकडा ११ काेटी रुपयांपर्यंत जाताे. एवढी सामाजिक बचत अशा प्रकारे समाजाच्या सहभागातून झाली अाहे. सहभागी वधूवरांच्या पालकांकडून नाममात्र नाेंदणी शुल्क घेतले जाते, तर राजस्थानी संस्कृतीनुरूप कपडे, दागिने, संसाराेपयाेगी साहित्य नवदांपत्यांना महेश सेवा संघ देते.

२१ वर्षांनंतर त्याच मंडपात मुलीचा विवाह
ज्या साेहळ्यात २१ वर्षांपूर्वी स्वत:चा विवाह झाला त्याच महेश सेवा संघाच्या सामुदायिक विवाह साेहळ्यात अापल्या मुलीचे कन्यादान करण्याचे भाग्य येथील व्यापारी गणेश ताेष्णीवाल यांना लाभले अाहे. गणेश यांना दाेन मुले, दाेन मुली अाहेत. त्यांची कन्या दुर्गा हिचा विवाह यंदा या साेहळ्यात हाेत अाहे. पित्याच्या सामाजिक सहभागाची परंपरा कन्येने सहभाग घेऊन राखली हेच या विवाह साेहळ्याचे यश म्हणावे लागेल. व्यक्तिगत पातळीवर लग्न केले तर अनेक मर्यादा पडतात, परंतु सामुदायिक साेहळ्यात संपूर्ण समाजाची उपस्थिती व अाशीर्वाद मिळतात, असे गणेश ताेष्णीवाल म्हणाले.