आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूतीवेळी बाळासह आईचाही मृत्यू, आरोग्य विभाग करणार चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - प्रसूतीच्या वेळी बाळाचा मृत्यू झाल्यानंतर प्रकृती खालावलेल्या मातेनेही काही तासांनी प्राण सोडले. ही घटना बीड येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी घडली. आरोग्य विभाग या माता- बालमृत्यूची चौकशी करणार आहे.

बीड तालुक्यातील देवीबाभूळगाव येथील दीपाली सचिन ढवळे (२८) यांना प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्री चौसाळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. बी. मंचुके यांनी शनिवारी रात्री एक वाजता प्रसूती केली. प्रसूतीदरम्यान बाळ मृत जन्मले. त्याच वेळी दीपाली यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे डॉ. मंचुके यांनी दीपाली यांना बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. तेथे शनिवारी सकाळी दीपाली यांचा मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी तपासणी : दीपाली यांची प्रसूतीची ही तिसरी वेळ होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी केली होती. त्या वेळी सर्व अहवाल नॉर्मल अाले होते; परंतु प्रसूतीवेळी कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. यानंतर दीपाली यांना धाप लागत असल्याने चौसाळा केंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.

गर्भातील पाणी कमी झाले
प्रसूतीदरम्यान दीपाली यांच्या गर्भातील पाणी कमी झाल्याने बाळ मृत जन्माला आले. प्रसूतीनंतर दीपाली यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला. - डॉ. के. डी. खाकरे, वैद्यकीय अधिकारी.