आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडलेल्या भोळसर विवाहितेने तिच्या एक वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाटोदा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वैद्यकिन्ही येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांना अर्धा एकर शेती असून मोलमजुरी करून ते गावातच राहतात. शिंदे यांचा विवाह सात वर्षापूर्वी बीड तालुक्यातील माळी चिंचोली येथील अश्विनीसाेबत झाला होता. विवाहानंतर या दांपत्यास एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. रविवारी सकाळी विवाहिता अश्विनी ही तिची एक वर्षाची मुलगी दीदीला बरोबर घेऊन चाकरवाडीला दर्शनासाठी जाते म्हणून घराबाहेर पडली. चाकरवाडीला दर्शनाला गेल्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिचा शोधाशोध सुरू केली. सोमवार व मंगळवारी या दोन्ही दिवशी तिचा तपास लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी अकरा वाजता वैद्यकिन्ही येथील शेतकरी नामदेव बांगर यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यावर अश्विनी व तिच्या मुलीचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना अाढळला. याची माहिती पाटोदा पोलिसांना देण्यात आली. पाटोदा पोलिसांनी वैद्यकिन्ही येथे भेट देऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला.