आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांनी दोन मुलींना विष पाजून मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा - असाध्य रोगाने ग्रासलेल्या पती-पत्नीने वैतागून आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केले. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) रात्री १२ वाजेच्या सुमारास लोहारा तालुक्यातील उदतपूर येथे घडली. यामध्ये चिमुकल्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला, तर पती-पत्नी उमरगा येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. उदतपूर येथील अभंग ऊर्फ दयानंद सुरेश पवार (३६) व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई (३२) या दोघांनाही असाध्य रोगाने ग्रासले होते. यातून त्यांना नैराश्य आले हाेते. आपला आजार मुलींनाही जडून त्यांनाही त्रासदायक जीवन जगावे लागू नये या भीतीपोटी अभंग ऊर्फ दयानंद पवार याने शुक्रवारी रात्री १२ वाजता पत्नी लक्ष्मीबाई, मुलगी सुषमा (९) व स्वराली (६) या चिमुकल्यांनाही रोगर हे विष पाजून स्वत:ही औषध घेतले. त्यामुळे दोन्ही चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू झाला, तर दयानंद व लक्ष्मीबाई या पती-पत्नीला अत्यवस्थ अवस्थेत उमरगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...