आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांचा अवमान केल्यानेच पत्नीचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- आई-वडिलांचा नेहमीच अपमान आणि वेळेवर जेवण दिले जात नसल्याने आपण पत्नीचा खून केल्याची कबुली शहरात शुक्रवारी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीने पोलिसांना दिली आहे. विशेष बाब म्हणजे दोघेही पती-पत्नी उच्चशिक्षित असून खासगी कंपनीत नोकरी करून चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करीत होते. शहरातील कमलानगर भागात शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास सुनीता महेंद्र गवई (३२) या महिलेच्या डोक्यात आणि गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी रात्रीच अटक केली. त्याला शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महेंद्र गवई याने खुनाची कबुली दिली. पत्नी सुनीता आपल्या आई-वडिलांचा नेहमीच अवमान करीत होती.
तसेच कार्यालयात कामासाठी जात असताना जेवण वेळेवर देत नव्हती. यामुळे आमच्यात नेहमीच वाद होत असत. शिवाय, पत्नीला नोकरी करू नको, असे सांगूनही ती नोकरीच्या शोधात होती आणि तिने मानधन तत्त्वावर नोकरीही मिळविली. या प्रकारांमुळे आपण वैतागलो आणि पत्नीचा खून केला, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...