आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूतीनंतर मायलेकाचा मृत्यू: उमापूर प्रा. आ. केंद्रातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई तालुक्यातील उमापूर येथे प्रसूतीनंतर बाळ व त्याच्या अाईचा मृत्यू झाल्याने प्राथमिक अाराेग्य केंद्राच्या परिसरात तणावाचे वातावरण हाेते.विवाहिता उज्ज्वला कवडे हिच्या मृतदेहाची तपासणी प्राथमिक अाराेग्य केंद्रात करण्यात अाली. त्या वेळी पाेलिस बंदाेबस्त वाढवण्यात अाला हाेता. - Divya Marathi
गेवराई तालुक्यातील उमापूर येथे प्रसूतीनंतर बाळ व त्याच्या अाईचा मृत्यू झाल्याने प्राथमिक अाराेग्य केंद्राच्या परिसरात तणावाचे वातावरण हाेते.विवाहिता उज्ज्वला कवडे हिच्या मृतदेहाची तपासणी प्राथमिक अाराेग्य केंद्रात करण्यात अाली. त्या वेळी पाेलिस बंदाेबस्त वाढवण्यात अाला हाेता.
गेवराई - प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री आठ वाजता घडली. विवाहितेची प्रसूती डॉक्टरांच्या गैरहजेरीतच तीन परिचारिकांनी केली. प्रसूतीनंतर योग्य ते उपचार न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस कारवाई करणार आहेत.
तालुक्यातील उमापूर येथील उज्ज्वलाचा (२०) विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील प्रकाश कवळे यांच्याशी ३० मे २०१४ रोजी झाला होता. उज्ज्वला गरोदर असल्याने उमापूर येथे माहेरी प्रसूतीसाठी पंधरा दिवसांपूर्वी आली होती. १५ मे २०१५ रोजी प्रसवपूर्व वेदना वाढल्याने उज्ज्वलास कुटुंबातील लोकांनी उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी आठ वाजता दाखल केले. सायंकाळी सहा वाजता नैसर्गिक पद्धतीने तिची प्रसूती झाली. तीन परिचारिकांनी तिची प्रसूती केली, परंतु या वेळी डॉक्टर उपस्थितच नव्हते. जन्मलेल्या मुलाचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर विवाहितेला अति रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टर नसल्याने परिचारिकांनी गेवराईला जाण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी विवाहितेला बुधवारी गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात काही वेळ उपचार केल्यांनतर डाॅक्टरांनी तिला अहमदनगर येथे नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईक जीपने शेवगावकडे जात असताना विवाहितेचा वाटेतच मृत्यू झाला, असे विवाहितेचा भाऊ अमोल देशमुख याने सांगितले.

उमापूरमध्ये कडकडीत बं
उज्ज्वला कवळेच्या मृतदेहाची गुरुवारी सकाळी अकरा वाजता उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. डाॅक्टरांचा हलगर्जीपणा व योग्य ते उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आरोग्य केंद्राभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विवाहिता व तिच्या बाळाच्या मृत्यूची माहिती मिळताच उमापूर येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.
ठाण्यात मृत्यूची नोंद

गेवराई येथील उपविभागीय अधिकारी राजकुमार चाफेकर, चकलांबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी उमापूर येथे भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. विवाहितेचा भाऊ अमोल शहाजी देशमुख यांनी चकलंबा ठाण्यातील माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहवाल आल्यावर कारवाई
या प्रकरणात विवाहितेच्या शवविच्छेदनाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर जर डाॅक्टर दोषी आढळले तर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार चाफेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पथकासोबत गेलाे होतो
बुधवारी सकाळी प्रसूतीसाठी अालेल्या सदरील महिलेची तपासणी करून मी तालुक्यातील बेलगाव येथे साथरोगावर अाळा घालण्यासंदर्भातील पथकाच्या सोबत गेलो होतो, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गाडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...