आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Through Its Girl In Garbage In Majalgaon Taluka

माजलगाव तालुक्यात मुलगी जन्मताच निर्दयी मातेने कच-यात फेकली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - मुलगी जन्मली म्हणून एका निर्दयी मातेने नवजात अर्भक फाटक्या पोत्यात घालून आझादनगर परिसरात मैदानातील कच-याच्या ढिगावर फेकून दिले. पाडव्याच्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने हे अर्भक एका महिलेच्या नजरेस पडले आणि त्याचे प्राण वाचले. अर्भकावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सकाळी साडेदहाच्या सुमारास आझादनगर भागात एका महिलेला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. एका फाटक्या पोत्यात जिवंत अर्भक गुंडाळलेले तिला दिसले. माजी नगरसेवक सलीम बापू यांना महिलेने माहिती दिली. त्यांनी शहर पोलिस व ग्रामीण रुग्णालयास कळवले. कडक उन्हात रडणा-या या नवजात मुलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डॉ. सचिन डक यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथोमपचारांनंतर अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवण्यात आले.