आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने तरुणाने मातृदिनीच पोलिस ठाण्याच्या आवारात जाळून घेतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- बाहेगव्हाण येथे कोचिंग क्लास चालवणाऱ्या अभिजित श्रीनिवास मस्के (२५) या युवकाने पोलिस ठाण्याच्या आवारात जाळून घेतले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आईच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने तो निराश होता. त्यामुळे त्याने रविवारी मातृदिनीच आत्महत्या केली असावी, असे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
 
बाहेगव्हाण येथे अभिजित मस्के आपल्या एम. जे. कोचिंग क्लासेसकडे निघाला. नात्यातील एक लग्न लावण्यासाठी वडवणीहून परत येतो, असे त्याने  नातेवाइकांना सांगितले. मात्र, सकाळी ११.३० वाजता त्याने वडवणी ठाण्याच्या आवारात पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
 
वडवणीचे पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एन. सोनवणे म्हणाले, अभिजित पेटलेल्या अवस्थेत सिमेंटच्या रिकाम्या गोण्या घेऊन आग विझवत होता. त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला तेव्हा आईच्या उपचारांसाठी पैसे नाहीत म्हणून तो निराश होता, असे कळले.
बातम्या आणखी आहेत...