आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत माय-लेकराचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथे सोमवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आई व मुलाचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुभांगी रामदास बिराजदार (२८) आणि प्रेम रामदास बिराजदार (०३) अशी मृत आई व मुलाची नावे आहेत. किराणा दुकानदार रामदास बिराजदार यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ते पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बांधकामाला पाणी मारण्यासाठी उठले असता त्यांना घरातून धूर येत असल्याचे दिसले. त्या वेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांची पत्नी व मुलगा आगीत सापडले होते. त्यानंतर त्यांनी विद्युत पुरवठा बंद करून शेजाऱ्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग विझवली; परंतु तोपर्यंत झोपेतच दोघांचाही मृत्यू झाला होता.

घराचे बांधकाम सुरू असल्याने दुकानाचे व इतर सर्व साहित्य एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. त्याच खोलीत आग लागल्याने ती ताबडतोब पसरली. प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी पंचनामा केला. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...