आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी फळी निष्क्रिय ठरल्यानेच आंदोलन- विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राज्यातील राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतील नेते निष्क्रिय ठरल्यानेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, असा टोला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला. तसेच एवढी वर्षे सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काही केले नाही, आता आंदोलने करत असल्याने लोक त्यांनाच नावे ठेवत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा समाचार घेतला.
तावडे शुक्रवारी (दि.१४) जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पत्रकारांनी पवारांचे आंदोलन व दुष्काळी प्रश्नाबाबत तावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात व केंद्रात अनेक वर्षे त्यांच्या हातात सत्ता असतानाही त्यांनी विकासकामे केली नाहीत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा अपेक्षित विकास साध्य होऊ शकला नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ आदी निष्प्रभ ठरल्यानेच पवार यांच्यावर

रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर नऊ महिन्यांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील २० हजारपैकी ५ हजार गावे जलयुक्त करण्याचा प्रयत्न आहे. अागामी काळातही विकासकामांनाच प्राधान्य राहील, असे विनोद तावडे यांनी सांगितले.