आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये शिवक्रांती युवा परिषदेकडून शासकीय अध्यादेशाची होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - तीन वर्षात राज्य सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्‍या घोषणा, दिलेल्‍या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. अध्यादेश तर केवळ फसवे आणि दिशाभूल करणारे ठरले आहेत. येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या कुठल्याच घोषणा ऐकायच्या नाहीत आणि अध्यादेश पहायचे नाहीत असा पवित्रा घेत बीडमध्ये शिवक्रांती युवा परिषदे कडून  शासनाच्या इबीसी सवलतीच्या अध्यादेशाची होळी करण्‍यात आली. रविवारी सकाळी बारा वाजता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्‍यात आले. 

 
रविवारी शिवक्रांती युवा परिषदेची विभागीय बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश बजगुडे यांनी सांगीतले की, मराठा आरक्षणाच्या विषयावर मागील काही वर्षापासुन आम्ही लढा देत असून अद्याप आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. उलट आरक्षणाच्‍या लढ्यावरील लक्ष इतरत्र वळवण्याचे  काम सरकार करत आहे. येणाऱ्या काळात शिवक्रांती संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचे त्‍यानी सांगीतले. उच्चतंत्र व शिक्षण विभागाच्‍या ७ ऑक्टोबर २०१७ च्या अध्यादेशानुसार एमबीबीएस व बीडीएसच्या विद्यार्थ्यांच्या इबीसी सवलतीची मर्यादा सहा लाखावंरून अडीच लाख केली आहे.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांंनी उच्च शिक्षण घेवु नये यासाठी सरकारने हा डाव केलेला आहे असा आरोपही त्‍यांनी यावेळी केला आहे. पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्त्यांकडून डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधुन राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. या आंदोलनात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा वैशाली पाटील, युवा प्रदेश सरचिटणीस योगेश सजगुरे, प्रदेश प्रवक्ते विक्रम घोडके, महिला प्रदेश उपाध्यक्षा पद्मावती टेकाळे, उस्मानाबाद  जिल्हा संपर्कप्रमुख राजेश गिरी, जालना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बळे, बीड जिल्हाध्यक्ष अॅड.शशीकांत वाळूंजकर,उमेश डमरे, शिवा बहिर,किरण काळे दत्ता गोसावी आदी सहभागी झाले.

 

राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी 
डोळ्यावर  काळ्या पट्ट्या बांधुन अध्यादेशाची होळी करतांना शिवक्रांती परिषदेच्या आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. राज्य सरकार हे सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांच्या मुळावर उठले आहे. शासन दिशाभुल करत असल्‍याचे अॅड. गणेश बजगुडे पाटील यांनी सांगीतले. 

 

मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही 
मराठवाड्यात हाताला कामे नसल्याने तरुण दिशाहीन झाला असून शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेराजगारांच्या मुळावर सरकार उठले आहे. मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, अन्यथा शिवक्रांती संघटना मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात फिरु देणार नाही असा इशाराही बजगुडे पाटील यांनी यावेळी दिला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...