आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या आरक्षणासाठी लढाई, बीडमधील सभेत खासदार ओवेसी यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 15 वर्षे मुस्लिम मतांचा वापर केला. आता 'सबका साथ सबका विकास' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्यांनीच राज्यातील मुस्लिमांना शिक्षणाचे आरक्षण देऊन 'सबका विकास' सिद्ध करून दाखवावे. यासाठी आमची लढाई असणार आहे, असे स्पष्ट मत ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुस्लिमिनचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले.
येथील तेलगाव रस्त्यावरील ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनच्या वतीने मुस्लिम आरक्षण मेळाव्यात खासदार ओवेसी बोलत होते. आमदार इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, जावेद कुरेशी, एस.आर. खादरी, अब्दुल समी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार ओवेसी म्हणाले, हिंदुस्थान चार हजार ६०० जातींनी व्यापलेला आहे. कोणत्याही एका जाती-धर्माचा हिंदुस्थान नाही. येथे राहणारा प्रत्येकजण हिंदुस्थानी आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण हा महाराष्ट्रीय आहे. मागील पंधरा वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेसाठी मुस्लिम मतांचा वापर केला. मुस्लिमांना शिक्षण, सामाजिक हक्कापासून वंचित ठेवले. सध्या भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आहे. त्यांनीही मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी भाषणातून दिला. मुस्लिम कुटुंबीयांकडे शिक्षणासाठी पैसा नसल्याने मुलांना शिक्षण देता येत नाही. परिणामी मुले बेरोजगार होत आहेत. आम्ही देशातील कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, परंतु शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी येणाऱ्या काळात मुस्लिम आरक्षणासाठी आमची लढाई असणार आहे, असेही ते म्हणाले.

'जय मीम, जय भीम'नारा
महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या समाजाला विकासाच्या धोरणापासून सत्ताधाऱ्यांनी बाजूला टाकले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी मतांचा वापर केला. मुस्लिम आणि दलितांच्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या काळात ह्यजय मीम, जय भीमह्ण असा आमचा अजेंडा असणार आहे, असे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.