आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची अनास्था: अधिवेशन होऊ देणार नाही, खासदार अशोक चव्हाणांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देगलूर येथील कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण. - Divya Marathi
देगलूर येथील कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण.
बीड/नांदेड -शेतकऱ्यांना शासनाने त्वरित कर्जमाफी पुढील हंगामासाठी मोफत बी-बियाणे दिले नाही तर विधिमंडळाचे पुढील अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी देगलूर येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
देगलूर येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर खासदार चव्हाण म्हणाले, फडणवीस सरकार सारखे असंवेदनशील सरकार राज्याने कधीही पाहिले नाही. शासकीय मदत मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्येपूर्वी शेतकरी तशा चिठ्ठ्या लिहून ठेवू लागलेत. त्या उपरही सरकार त्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांप्रती सरकारची आस्था संपली आहे. एलबीटीला पर्याय म्हणून राज्यात व्हॅटवर अधिभार लावण्यासंदर्भात सरकार विचार करीत आहे. एलबीटी फक्त महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू होता. त्यामुळे एलबीटी रद्द केल्यानंतर होणारी महसुली तूट भरून काढण्यासाठी पर्यायी उपाययोजना केवळ शहरी भागातच लागू करायला हवी. नुकसान भरपाई देण्यासाठी ग्रामीण जनतेवर व्हॅटचा अधिभार कशाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नापिकीला कंटाळून दोघांच्या आत्महत्या
नापिकी,कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. बीड आणि नांदेड जिल्ह्यात या घटना घडल्या.

हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी येथे पंडित दत्तराव माने (४५) या शेतकऱ्याने मंगळवारी रात्री वाजेच्या सुमाराला नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. घरातील लोकांना ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळवट बोरगाव (ता. गेवराई) येथे उत्तमराव त्र्यंबकराव गाडे (५५) या शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतात अंाब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गाडे यांना दहा एकर कोरडवाहू शेती असून त्यांनी पाडळसिंगी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

तीन वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती, डोक्यावरचे कर्ज खरीप हंगामात बियाणे खरेदीसाठी पैसे कोठून आणायचे या विंवचनेत शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात कल्याण आसाराम गाडे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.