आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार मुंडे समर्थक आमदार अमरसिंह पंडितांच्या घरावर धडकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आमदार अमरसिंह पंडित यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री पंडित यांच्या घरावर मोर्चा काढला. त्याच वेळी पंडित समर्थकही तिथे जमा झाले. दोन्ही समर्थक आमने-सामने आल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसही तिथे तत्काळ दाखल झाले. खासदार मुंडे यांच्याबद्दल आमदार पंडित यांनी अपशब्द उच्चारले, ही माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. भाजप पदाधिकारी व समर्थकांनी अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील पंडित यांच्या निवासस्थानासमोर जमा होत घोषणा दिल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, रविवारी आमदार पंडित यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी सांगितले.