आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव यांना मारहाण, हिंगोलीत पडसाद: मोदींचा पुतळा जाळला, बससह भाजप कार्यालय फोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते खासदार राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीचा येथे निषेध करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी हिंसक 

आंदोलन केले.   

 

काँग्रेसचे नेते हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे गुजरातमध्ये स्टार प्रचारक म्हणून प्रचारकामी आहेत. शनिवारी मध्यरात्री राजकोटमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमारात खासदार राजीव सातव यांनाही गुजरात पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली. या घटनेचे आज जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद पडले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ च्या सुमारास काही तरुणांनी हैदोस घालून विश्रामगृहाची तोडफोड केली. तसेच आज सकाळी औंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षा दीपाली पाटील यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि रस्त्यावर प्रधानमंत्री मोदी यांचा पुतळा जाळला. तसेच औंढा येथेच आज सकाळी ११ वाजता काही तरुणांनी राज्य परिवहनच्या बसगाडीवर (क्र. एमएच ४० एच ८४५७)  दगडफेक करून नुकसान केले. हिंगोली शहरात गांधी चौकात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने तासभर निदर्शने करून राजीव सातव यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

 

याशिवाय आज कळमनुरी, आखाडा बाळापूर येथेही रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली. आमदार संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, बाबुराव घोंगडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोनधारे, अब्दुल हाफिज, विलास गोरे, विनायक देशमुख आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन झाले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... पोस्टर का लावू दिले नाही याचा जाब विचारण्यास गेले असता झाली मारहाण,  काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा केला निषेध...

 

हेही वाचा... 

खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलिसांकडून मारहाण, अटक आणि सुटका

बातम्या आणखी आहेत...