आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची तुरूंगात भेट; पत्रकारांना म्हणाल्या, हॅपी होली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सदन प्रकरणात भ्रष्टाचार करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या छगन भुजबळांच्या भेटीसाठी खासदार सुप्रिया सुळे आर्थर रोड तुरुंगात पोहचल्या. दुपारी 12 च्या सुमारास सुळे यांनी भुजबळ यांची भेट घेतली. आपल्याला माहित असेलच की समीर आणि छगन भुजबळ हे चुलते पुतणे सध्या एकाच म्हणजे आर्थर रोड जेलमध्ये आहेत.
छघन भुजबळांना गुरुवारी कोर्टाने 31 मार्चपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याआधी गुरुवारी समीर आणि छगन भुजबळ यांची ईडी कार्यालयात समोरासमोर पाच तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्याआधी सोमवारी ईडीने तब्बल 11 तास चौकशी केल्यानंतर छगन भुजबळांना अटक केली होती. या अटकेमुळे राष्ट्रवाजीसह भुजबळांना मोठा धक्का देणारी ठरली. आपण भुजबळांच्या पाठीशी असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवारांनी म्हटले होते. मात्र, त्यावेळी ते संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत होते. खासदार सुप्रिया सुळेही दिल्लीत होत्या. काल रात्री पवारांसह सुळे मुंबईत परतताच आज सकाळी भुजबळांच्या भेटीला गेल्या.
बातम्या आणखी आहेत...