आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार संजय जाधव यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ढिसाळ कार्यपद्धतीच्या निषेधार्थ खा.संजय जाधव यांनी शुक्रवारी उपमहाव्यवस्थापक कार्यालयास घेराव घालून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयास टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अखंडित सेवा देण्याबाबत व इतर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
बीएसएनएलची सेवा सातत्याने कोलमडत आहे. मोबाइल व टेलिफोन ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून सर्वाधिक नेटधारकांना या अखंडित सेवेचा फटका बसू लागला आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीदेखील दूरसंचार विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्राहकांना सेवा व सुविधा सुरळीतपणे मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात खा.जाधव यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतरही सेवेत सुधारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर खा.जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बीएसएनएलसमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनात जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, जिल्हा समन्वयक सुधाकर खराटे, तालुकाप्रमुख नंदू अवचार, मनपाचे गटनेते अतुल सरोदे, मधुकर निरपणे, विलास गीते, संजय सारणीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप अवचार, भगवान धस, विष्णू अवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदी सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...