आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलासा देण्यास हिंगोली आगाराची चालढकल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - मानव विकास मिशनच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या बसमध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी होत असल्याबाबत दिव्य मराठीने 6 ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन मानव विकास आयुक्त (औरंगाबाद) कार्यालयाने जिल्हा समन्वयकांना नोटीस बजावून हिंगोली आगाराकडून खुलासा घेण्याचे आदेश दिले होते, परंतु येथील समन्वयक कार्यालयाच्या आगार प्रमुखांनी खुलासा सादर केलेला नाही.

4 ऑगस्ट रोजी सिरसम येथे जाणार्‍या बसमध्ये इतर प्रवाशांनी जागा बळकावल्यामुळे विद्यार्थिनींना उभे राहण्याची वेळ आली होती. हे वृत्त दिव्य मराठीने छायाचित्रासह प्रकाशित केले होते. मानव विकासच्या आयुक्तांनी येथील जिल्हा समन्वयकांना दिव्य मराठीच्या कात्रणासह नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. संबंधित बस आगाराला ताकीद देऊन पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची दखल घेण्याचे आदेशही दिले होते.