आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीचे अध्यक्ष जीवन गोरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांची पदावरून उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जीवन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. परिवहन प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा यांचे पत्र गोरे यांना मंगळवारी मिळाले. गोरे यांनी दोन वेळा उस्मानाबाद जि. प. अध्यक्षपद भूषवले आहे.
गोरे यांनी वैधानिक विकास मंडळ आणि राज्य वित्त आयोगाचे सदस्य, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.