आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुफ्तींच्या कुटुंबाने रिकामा केला मुख्यमंत्र्यांचा बंगला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील सत्ता स्थापनेचे गूढ कायम असतानाच माजी मुख्यमंत्री दिवंगत मुफ्ती मोहंमद सईद यांच्या कुटुंबाने जम्मू येथील मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे केले आहे. त्यावरून मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सईद यांच्या निधनाच्या ११ दिवसांनंतर त्यांची पत्नी बेगम गुलशन १८ जानेवारीला त्यांच्या बंगल्यात पोहोचल्या आणि सामान घेऊन गेल्या. पीडीपी प्रवक्ता नईम अख्तर म्हणाले, मुफ्ती साहेब आता मुख्यमंत्री नाहीत. त्यामुळे नियमाचे पालन करून त्यांच्या कुटुंबीयांनी चांगल्या परंपरेचा पायंडा पाडताना बंगल्यातील सामान हटवले आहे. त्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये; परंतु राजकीय अटकळी लढवल्या जात आहेत. कारण पीडीपी-भाजप आघाडी राहिल्यास मेहबुबाच आगामी मुख्यमंत्री असतील. राज्याच्या ८७ सदस्यीय विधानसभेत २७ आमदारांच्या मदतीने पीडीपी सर्वात मोठा पक्ष आहे.
भाजपकडे २५ सदस्य आहेत. सईद यांच्या निधनापूर्वी दोन्ही पक्षांचे आघाडी सरकार होते; परंतु त्यानंतर मेहबुबा सरकारच्या स्थापनेचे गूढ तयार झाले. ८ जानेवारीपासून राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. दरम्यान, मेहबुबा ३१ जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात मेहबुबा सरकार स्थापनेबाबतचा आढावा घेऊ शकतात. त्यातूनच काही संकेत मिळतील.