आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरपालिका निवडणूक : आज थांबणार भोंग्यांची किरकिर !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- प्रचाराची दणक्यात सुरू असलेली ध्वनिफीत आणि वाहनामध्ये बसून प्रचारगीत गाणाऱ्या गायकांचा आवाज शनिवारी (दि.२६) सायंकाळी बंद होईल. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहराच्या विविध भागात सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या कर्णकर्कश आवाजाने मतदारांची झोप उडाली होती. चारही प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढली असून त्यामुळे मतदारही संभ्रमात दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी या वेळी हायटेक आणि रस्त्यावरची यंत्रणा राबविण्यात आली. लोकसभेत आणि विधानसभेत दिसणाऱ्या डिजिटल प्रचाराच्या गाड्या या वेळी नगर पालिकेच्या निवडणुकीत शहरात गल्लोगल्ली धावत होत्या.
या गाड्यांनी देश आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांची भाषणे मतदारांना ऐकविली. गाड्यांमध्ये बसून वाद्याच्या स्वरातून गाणे गात मतदारांचे मनोरंजन करतानाच आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले. काही गाड्यांवर लाऊडस्पीकर लाऊन तर काही वाहनांवर एलईडी स्लाइड दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नात मात्र सर्वच पक्षाचे उमेदवार नियमांचा भंग करीत होते.

एका ठिकाणी थांबून विशिष्ट आवाजाच्या मर्यादेतच ध्वनिफीत लावून प्रचार करण्याचा नियम आहे. या नियमांकडे जसे उमेदवारांनी दुर्लक्ष केले, तसे निवडणूक विभागानेही दुर्लक्ष केल्याने मतदारांना कमालीचा त्रास होत होता. शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने आवाजाची तीव्रता काहीशी वाढू शकते. रविवारपासून मात्र मतदारांना किरकिर ऐकायला मिळणार नाही.

संयमाने प्रचार
निवडणुकीतगोंधळ, वाद, असे प्रकार घडतात. मात्र, या वेळी पालिका निवडणुकीत असे प्रकार घडले नाहीत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना उमेदवारांनी पातळी सोडली नाही. संयमित भाषेत आणि वादाचे प्रसंग टाळत प्रचार झाल्याने त्यातून होणारा त्रासही नागरिकांनाही जाणवला नाही.

आज पदयात्रा
प्रचाराचाशेवटचा दिवस असल्याने शनिवारी विविध भागांत पक्षातर्फे प्रचारासाठी जोर लावण्यात येईल. नगराध्यक्षपदासाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. रात्री मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर सुरू राहील.

प्रभागात कोण काेण? : या वेळी भाजपने स्वतंत्ररीत्या लढण्याचा निर्णय घेतल्याने तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही झाल्याने पालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली. एका प्रभागात चारही प्रमुख पक्षांचे उमदेवार निवडणूक रिंगणात असल्याने तसेच काही बंडखोर, अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने बहुतांश मतदारांना आपल्याच प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत हे कळायला वेळ लागत होता.
बातम्या आणखी आहेत...