आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखेड पोटनिवडणुकीत भाजपचे राठोड विजयी, बेटमोगरेकर 47,248 मतांनी पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- मुखेडविधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. हा विजय अपेक्षितच होता, परंतु उमेदवारीवरून राठोड कुटुंबात निर्माण झालेले मतभेद, बदलती राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर निकाल धक्कादायक लागतो का, याकडे लक्ष लागले होते. काँग्रेसने बेटमोगरेकरांना उमेदवारी देऊन भाजपचा विजयाचा मार्ग सोपा केला.
दिवंगत गोविंदराव राठोड यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून राठोड कुटुंबात बरेच महाभारत झाले. गंगाधर डॉ. तुषार राठोड यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी राठोड कुटुंबावर सोपवला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही मुलांना बाजूला ठेवून बंधू किशनराव राठोड यांनी लढण्याची तयारी केली. परंतु अखेर डॉ. तुषार राठोड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आल्याने हा वाद मिटला. या वादाचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष होते.
भाजप-काँग्रेस यांच्यात सरळ लढत असल्याने काँग्रेसने जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काँग्रेसचे हे प्रयत्न पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, दिलीप कांबळे, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, विनोद तावडे यांनीही मुखेडला हजेरी लावली होती.
अशी मिळाली मते-
मोजलेलीमते: लाख५७ हजार ७१९
डॉ. राठोड (भाजप) लाख ३१९
बेटमोगरेकर (काँग्रेस) ५३,०७१
अलिमोद्दीन हाफिसाब (मुस्लिम लीग) ११४५
विजय कांबळे (रिपाइं) ४८३
अनिल शिर्से ९६२
अफझल शेख २६३
विजयमाला गायकवाड ५११
मताधिक्य- ४७ हजार २४८