आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखेड विधानसभा पोटनिवडणूक; आज निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मुखेड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा सोमवारी फैसला लागणार आहे. गोविंद राठोड यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या या जागेकरिता शुक्रवारी मतदान झाले. काँग्रेस व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
भाजपचे तुषार राठोड व काँग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात सरळ लढत आहे. सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ३३२ मतदान केंद्रांवर ५७ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी जिल्हा परिषद कन्या शाळेत सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.