आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रूणहत्या करणार्‍यांना आम्ही जामीन देत नाही - न्या. शहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दुर्गाशक्तीचा सन्मान केला पाहिजे. बीड जिल्ह्यातील लिंगभेद प्रमाणात प्रचंड तफावत असून ते समान होणे गरजेचे आहे. म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या प्रकरणांत आम्ही जामीन देत नाहीत. जे न्यायाधीश जामीन देतात त्यांनाही आम्ही चांगले बघत नाहीत, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी शनिवारी व्यक्त केले.
येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी न्या. शहा बोलत होते. ते म्हणाले, स्त्री भ्रूणहत्या चुकीचीच आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणेने कामास लागले पाहिजे, अशी अपेक्षाही शहा यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार गोपीनाथ मुंडे, न्या. अंबादास जोशी, संभाजी शिंदे, रवींद्र बोर्डे, कैलासचंद चांदीवाल, न्या. विनय बोरीकर, जिल्हा न्यायाधीश स्वप्निल खटी, राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष आशिष देशमुख, सचिव सतीश चव्हाण, वसंत सोळंके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अजय राख यांची या वेही प्रमुख उपस्थिती होती.
वकिलांच्या मानधनात लवकरच दुपटीने वाढ
बीड येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये ई-लायब्ररीसह अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत. जिल्हा सरकारी वकिलांच्या मानधनात लवकरच दुपटीने वाढ होईल, अशी माहिती पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या वेळी दिली.

मुंडेंनी विरोधी पक्षाचीच बाजू सांभाळावी
खासदार मुंडे माझ्याबद्दल आज बोलले. त्यांची वाक्ये फ्रेम करून ठेवू. ते खंबीर विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी तीच बाजू अगदी समर्थपणे सांभाळावी. सरकारी वकिलांच्या मानधनात लवकरच दुपटीने वाढ करण्यात येणार आहे.’’ जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री