आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai's Mocca Special Court Issued Arreste Warrant

अतिरेकी कागजीवविरूध्‍द मुंबईच्या मोक्का विशेष न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - औरंगाबादजवळील शस्त्रसाठ्यासह मुंबई, पुण्यातील हल्ल्यातील विविध गुन्ह्यांत फरार असलेला अतिरेकी फय्याज कागजीविरुद्ध मुंबईच्या मोक्का विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याची प्रत गुरुवारी सायंकाळी औरंगाबाद एटीएसने कागजीच्या बीड येथील फेरोजशाहनगर, नवीन शहेनशहानगर भागातील घरावर डकवली. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बीडच्या जबिउद्दीन अन्सारीचा मित्र कागजी वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात वाँटेड आहे. कागजी फरार असल्याने त्याने येत्या 17 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत शरण यावे, यासाठी मुंबईच्या मोक्का विशेष न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. तुपे व त्यांच्या सहका-यांनी कागजीच्या घराच्या दारावर वॉरंट डकवले.