आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार, याची उत्तरे द्या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - परळीतल्या कार्यक्रमात अजित पवारांनी मराठवाड्याचा विकास करणार, अशी वल्गना केली. मात्र, त्यांच्याच कार्यकाळात मराठवाड्याच्या विकासाला खीळ बसली. अनेक योजना पश्चिम महाराष्ट्रात गेल्या. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी त्यांनीच येऊ दिले नाही. त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढून आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी दिले.
ते म्हणाले की, गेल्या 12 वर्षांत मराठवाड्याची अधोगती झाली. कृष्णा खोºयातील मराठवाड्याच्या हक्काचे 28 टीएमसी पाणी अजितदादांच्या विरोधामुळेच मिळालेले नाही. ‘इंडिया बुल्स’ला यांनी पाणी दिले. मराठवाड्याला मात्र विरोध केला. मराठवाड्यात टेक्निकल विद्यापीठ, कला विद्यापीठ मंजूर झाले होते. ते त्यांनी पुण्याला नेले. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचा निधी
रोखला. जायकवाडीच्या कालवा दुरुस्तीला पैसा दिला नाही. दरडोई विजेचा वापर मराठवाड्यात सर्वांत कमी आहे. मात्र, येथे लोडशेडिंग
सर्वाधिक आहे. ट्रान्सफार्मर जळाला तर 15-15 दिवस बसवला जात नाही. मराठवाड्यात टेक्सटाइल झोन होऊ दिला नाही.
मागासलेल्या विभागासाठी विकास महामंडळे कार्यरत होती ती अजित पवारांच्या काळात बंद पडली. रस्ते विकासाचा निधी यांनीच रोखला. पश्चिम महाराष्ट्रातील सगळे जिल्हे परस्परांना चौपदरी रस्त्यांनी जोडल. मराठवाड्यात मात्र टोल कंत्राटदारांना पुढे करून रस्ते करण्याचा प्रस्ताव आहे. पाटबंधारे विभागाचा मोठा अनुशेष होता. तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या काळात पैसे आले; मात्र अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर पैसे देणे बंद केले. हे प्रकल्प झाले असते तर मराठवाड्यातील दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली असती.
बँक कुणी बुडवली ?
बीडच्या जिल्हा बँकेत 60 कोटींच्या ठेवी होत्या. त्या आपण 1150 कोटींवर नेल्या. मात्र, राजकीय द्वेषापोटी अजितदादांनी ही बँक बरखास्त केली. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सामान्यांच्या 8 हजार कोटींच्या ठेवी होत्या. तेथे पवारांच्या गैरकारभारामुळे सुमारे 2600 कोटींचा तोटा झाला. मी बीड जिल्हा बँकेला जबाबदार असेन तर राज्य बँक बुडण्याला अजित पवारच जबाबदार आहेत. सरकारी अनुदान आणि शेतकºयांच्या पैशातून कारखाने उभे ठाकले होते. मात्र, ते लिलावात काढून 5 -10 कोटींना विकण्याचे पाप अजितदादांनीच केले. या प्रकारांची सीबीआय चौकशी करावी. बीडच्या विकासाची चिंता बारामतीत जन्मलेल्यांनी करू नये. बीड जिल्ह्यात जन्म घेतलेला मी त्यासाठी समर्थ आहे. सूतगिरण्या, साखर कारखाने यातून आम्ही अगोदरच विकास केला असा दावाही मुंडेंनी केला.

खुल्या मंचावर चर्चा करावी
राजकीय पक्षबदलाच्या कार्यक्रमात मराठवाड्याचा विकास करू, असे म्हणणाºया अजित पवारांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. यासाठी खुल्या मंचावर येऊन चर्चा करायची आपली तयारी आहे. अजित पवारांनीही ती दाखवावी, असे आव्हानच मुंडेंनी दिले. आपण ओबीसींची बाजू घेतो, असे म्हणून आपल्याला हिणवण्यात आले. त्यांच्या मनात मागास जातींबद्दल आकस आहे. ओबीसींची लढाई आपण लढतो याबद्दल आपल्याला अभिमान आहे. कुणी कितीही हिणवले तरी ती आपण लढतच राहणार.