आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरपालिका निवडणुकीला गालबोट : मुरूममध्ये पोलिसांवर प्राणघातक हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मुरूम (ता.उमरगा) नगरपालिका निवडणुकीला शनिवारी(दि.२६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गालबोट लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्यासह काँग्रेस तसेच राष्ट्रवादी, शिवसेनेच्या ३७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी २७ जणांना अटक करण्यात आली असून, १० जण फरार आहेत.

पोलिस सूत्रांनी संागितले, मुरूम नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक ५ मध्ये नेहरू नगर मस्जिद समोर दिसल्यानंतर गावातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करीत वाद सुरू केला. हा प्रकार समजल्यानंतर मुरूम पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांना लोकांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून व डोक्यात दगड मारून जखमी केले. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,पोलिस कॉन्स्टेबल ऋषीकेश गवळी, आर. एच. कोळी हे जखमी झाले.

विलास गोबाडे यांनी मुरूम पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आमदार बसवराज पाटील यांचे पुत्र शरण बसवराज पाटील,नानासाहेब पाटील, राजू मुल्ला, अहमदशहा पटेल, इब्राहिम नदाफ, चंद्रशेखर मुदकन्ना, धनंजय चंद्रशेखर मुदकन्ना, अब्बास मुल्ला, अप्पासाहेब दिंडेगावे, महंमद मुल्ला, शिवराज गुरबसप्पा पाटील,अशोक प्रकाश पाटील, सुधीर महावीर चव्हाण, ओमकार रामकिशन कुंभार, रणजित भगवान राजपूत,राजू गुलाब अंबुसे,दस्तगीर बाबू चिकुन्द्रे, राचय्या सिद्धाराम स्वामी, अमर प्रकाश पाटील, सचिन शिवशंकर वाकळे, सिद्धलिंग शिवचर स्वामी,अविनाश शरणप्पा भोसगे,पृथ्वीराज धनाप्पागिरीबा,निर्मलकुमार जगनाथ लिमये, मेहबूब चांदसाब नदाफ, शिवराज बसवराज मेनसे, प्रसन्न गुलचंद कांबळे, मनीष लिंबानप्पा मुदकन्ना, प्रशांत काशीनाथ मुदकन्ना, बाबासाहेब सुरेश कटारे,जगदीश शिवशंकर निंबरंगे, खंडेराव कमलाकर वासुदेव, गुरलिंगप्पा अशोक दिंडेगांवे, बाबा नजीरसाब कुरेशी, रफिक दादामियाँ पटेल, संगमेश सुरेश कारभारी,(सर्व रा मुरूम)यांच्यावर गुन्हा दाखल झाला.शरण बसवराज पाटील,नानासाहेब पाटील,राजू मुल्ला,अहमदशहा पटेल, इब्राहिम नदाफ,चंद्रशेखर मुदकन्ना,धनंजय चंद्रशेखर मुदकन्ना ,अब्बास मुल्ला,अप्पासाहेब दिंडेगांवे, महंमद मुल्ला हे फरार झाले आहेत. उर्वरित आरोपींना अटक झाली आहे.

पुढे वाचा, सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत करून सुरू झाले मतदान...
बातम्या आणखी आहेत...