आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना नगरपालिकेतील स्वीकृत सदस्य अब्दुल हाफिज यांचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालना नगरपालिकेतील स्वीकृत सदस्य अब्दुल हाफिज यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिका-यांकडे सादर केला असून वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जालना नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यानंतर 30 डिसेंबर 2011 रोजी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. तेव्हा पालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हाफिज यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देण्यात आली होती. मात्र या निवडीला 15 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच अब्दुल हाफिज यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी कधीच आग्रह धरला नव्हता, मात्र आमदार कैलास गोरंट्याल यांच्या सूचनेनुसार आपण ही जबाबदारी स्वीकारली होती. वैयक्तिक कारणामुळे या पदाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे हाफिज यांनी म्हटले आहे.