आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या स्थायी समिती सभापतिपदी गणेश देशमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थायी समिती सभापतिपदी गणेश देशमुख यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
स्थायी समिती सभापतिपदी गणेश देशमुख यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
परभणी- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसचे गणेश सुरेश देशमुख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
बी.रघुनाथ सभागृहात स्थायी समितीच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी दहा वाजता निवड प्रक्रिया घेण्यात आली. मनपाचे उपायुक्त रणजित पाटील, नगर सचिव चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (दि. १५) गणेश देशमुख यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्याप्रमाणे अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणांत सभापतिपद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. या वेळी नूतन सभापती देशमुख यांचा महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते प्रताप देशमुख, विजय जामकर आदींसह नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला.
बातम्या आणखी आहेत...