आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून केला पुतण्याचा खून, हिंगोली जिल्‍ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - क्षुल्लक कारणावरून तालुक्यातील इसापूर रमना येथे काकाने २४ वर्षीय पुतण्याचा धारदार चाकूचे वार करून खून केला. या घटनेमुळे मृताची १९ वर्षीय पत्नी लग्नानंतर वर्षात विधवा झाली.

इसापूर रमना येथील खून प्रकरणातील मृत राजू बबन चौतमल याची पत्नी अश्विनी हिने बासंबा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १० डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास राजू व त्याचा काका बापूराव योगाजी चौतमल यांच्यात शाब्दिक वाद झाला. माझ्या आईच्या आजारपणाला घरातले लोक पैसे का लावत नाहीत, असा जाब राजूने काकाला विचारला. तू खूप शहाणा झाला का, असे म्हणून बापूरावने धारदार चाकूने राजूच्या मानेवर वार केले. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या राजूला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. बासंबा ठाण्याचे पीआय सुधाकर आडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...