आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड तालुक्यात बांधाचा वाद; शेवगा येथे वृद्धाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शेताच्याबांधावर असलेल्या खुणा मान्य नसल्याच्या कारणावरून ६५ वर्षीय वृद्धाला काठीने जबर मारहाण करण्यात आली. यात वृद्धाचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातील शेवगा येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. शेषराव नारायण खोरे (६५, शेवगा, ता. अंबड) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी आबासाहेब रामजी बोगाने, सखाराम नारायण बोगाने, सोपान आसाराम बोगाने, रावसाहेब सूर्यभान बोगाने, बद्री रावसाहेब बोगाने, नामदेव रावसाहेब बोगाने, भगवान माधव बोगाने, ज्योती आबासाहेब बोगाने, वर्षा सोपान बोगाने (सर्व रा. शेवगा, ता. अंबड) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी सुदर्शन शेषराव खोरे (३६) यांचा भाऊ उद्धव वडिलांना शेवगा शिवारातील गट क्र. मधील रोवलेल्या सामायिक बांधावरील खुणा मान्य नसल्याच्या कारणावरून बोगाने कुटुंबातील नऊ जणांनी सुरुवातीस शिवीगाळ, धक्काबुक्की मारहाण केली. या वेळी सोपान बोगाने याने सुदर्शन खोरे यांना डाव्या हाताच्या दंडावर चावा घेऊन जखमी केले, तर सखाराम बोगाने याने शेषराव खोरे यांच्या डोक्यात लाकूड मारून जखमी केले.

या मारहाणीत शेषराव खोरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक टी. सी. राजपूत हे करत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मेहेत्रे, पाटील राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर्य जाणून घेतले.
बातम्या आणखी आहेत...