आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून करून मृतदेह औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारात फेकून दिल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी औंढा पोलिसांनी गंगुबाई विष्णू डोईफोडे (30, गोजेगाव, ता.औंढा), किरण ऊर्फ माधव खेमा राठोड (आडगाव तांडा, ता.जिंतूर) या दोन जणांना शनिवारी अटक केली. तिसरा आरोपी नितीन घुगे (कुरुळा, जि. वाशीम) याला अटक करण्यासाठी औंढा पोलिसांचे पथक वाशीमकडे रवाना झाले आहे.
जालना जिल्ह्यातील अंभुरा येथील विष्णू धोंडिबा डोईफोडे (35) गोजेगाव येथे दोन वर्षांपासून सासुरवाडीत राहात होते. त्यांची पत्नी गंगुबाईचे आडगाव येथील माधव राठोड याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे 14 जुलै रोजी गंगुबाईने माधवच्या मदतीने कुर्‍हाडीने वार करून विष्णूचा खून केला. मृतदेह गोजेगाव शिवारात लपवला. एका गुराख्याला 3 ऑगस्ट रोजी हा मृतदेह आढळून आला. गोजेगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सांगळे यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.