आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाबा चालकाचा गिरवलीत खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत अ‍ॅटॅ्रसिटीचा गुन्हा का दाखल केला या कारणावरून ढाबाचालकाचा सहा जणांनी पोटात चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री दीड वाजता घडली. परळी रोडवर दोन महिन्यांपूर्वी दत्ता भीमराव काळे (25) यांनी ढाबा सुरू केला.

शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ढाबा बंद केल्यानंतर काळे गिरवली गावात आल्यावर कल्याण श्रीहरी आपेट, अतुल धनराज आपेट, विजय धनराज आपेट, यशवंत दिलीप कांबळे, संतोष दिलीप कांबळे, राहुल बळीराम आपेट या सहा जणांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून पोटात चाकूने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. बर्दापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.