आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने दोन मुलांसह पत्नीस दगडाने ठेचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथे घरात किरकोळ वादावरून पतीने पत्नीसह दोन मुलांना फरशी डोक्यात घालून ठार केले. ही घटना २० जून रोजी मध्यरात्री १२.३० ते १.३० च्या दरम्यान घडली.

धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथे हौसाजी भाऊराव जगदंबे (३२) हा युवक बेरोजगार होता. २० जून रोजी तो नेहमीप्रमाणे दिवस मावळल्यावर घरी आला घरात वादावादी झाली. वाद रात्री ११ च्या सुमारास मिटल्याने पत्नी रेखाबाई (३०) ही मोठी मुलगी दुर्गा (५) मुलगा रामेश्वर (अडीच वर्षे) यांना जेऊ घालून मुलांसह झोपली. त्यांना झोप लागल्याची खात्री होताच हौसाजीने घरातील फरशीचा दगड उपसून झोपलेल्या तिघांच्या डोक्यावर मानेवर वार केले. यात तिघे जागीच ठार झाले.
बातम्या आणखी आहेत...