आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या नातेवाइकांच्या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसाळा - मुलीबरोबर गावातील तरुणाचे प्रेमसंबध मान्य नसल्याने नातेवाइकांनी दोघांना केलेल्या मारहाणीत प्रियकराचा जागीच मृत्यू झाला, तर प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली.

पौळ पिंपरी येथील श्रीकिसन नारायण शिंदे (४०) याचे गावातील तरुणीबरोबर तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याला दोन्ही कुटुंबांतील लोकांचा विरोध होता. असे असतानाही दोघांत लपूनछपून भेटीगाठी होत होत्या. याचा राग मनात धरून मुलीची आई मन्नाबी हसन पठाण, भाऊ मैनुद्दीन हसन पठाण, परळी येथील नातेवाईक या तिघांनी शुक्रवारी पहाटे एक वाजता मुलीसह प्रियकर श्रीकिसन शिंदे या दोघांना काठीने जबर मारहाण केली. मारहाणीनंतर दोघांना रिक्षात बसवून रिक्षा रात्री सिरसाळा पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी रिक्षातील दोघांची तपासणी केली असता शिंदे याचा मृत्यू झालेला होता. तरुणी गंभीर जखमी झाली होती.

दरम्यान, मृताची पत्नी मनीषा यांनी सिरसाळा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. एस. सोनवणे करीत आहेत.