आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला मारून ठाण्यात; म्हणे अजिबात दु:ख नाही, सेलू शहरातील खून प्रकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- सेलूशहरातील हमालवाडी परिसरात पतीने पत्नीचा निर्घृण खून करीत काही वेळातच पोलिस ठाण्यात हजर होण्याचा प्रकार घडला. शुक्रवारी (दि. १२) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. पतीने खुनाची कबुली देताना खून केल्याचे तिळमात्र दु:ख नसल्याचेही म्हटले आहे. अस्लम शेख असे त्याचे नाव आहे.
सेलू शहरातील हमालवाडी परिसरात अस्लम शेख अमीन शेख हा पत्नी अंजुम दोन मुलांसोबत वास्तव्यास होता. तो मूळचा अंबरनाथ-मुंबई येथील रहिवासी असून त्याचे अंजुमबरोबर २९ जून २००८ मध्ये लग्न झाले होते. या दांपत्यास चार वर्षे अडीच वर्षे वयाची दोन मुले आहेत. त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अंजुम ही घरात एकटीच असताना अस्लमने चाकूने तिच्या गळ्यावर शरीरावर जोरदार वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेतच अंजुम ही याच परिसरात राहत असलेल्या तिच्या आईच्या घरी धावतच गेली. परंतु जखमांतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे तिचा तेथेच मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीवर सपासप वार केल्यानंतर घटनास्थळावरून गायब झालेल्या अस्लमने सुमारे तासाभरातच सेलू पोलिस ठाण्यात दाखल होत हा प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, अंजुम हिची आई मुमताज शेख (४५) हिने सेलू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत अस्लम शेख अंजुम या पती-पत्नीत नेहमीच भांडणे होत असत. त्यातच अस्लमला दारू जुगाराचे व्यसन होते. त्यानेच पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात अस्लमविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सी. आर. रोडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक बाबूराव राठोड, फौजदार आर. पी. तायवडे करीत आहेत.
दीपकवरही वार
पत्नीचा खून केल्यानंतर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अस्लम शेखने आपणास पत्नीचा खून केल्याचे तिळमात्र दु:ख नसल्याचे सांगताना काही वेगळीच माहिती पत्रकारांना दिली. तो म्हणाला, पत्नीवर वार करण्यापूर्वी त्याने दीपक नावाच्या व्यक्तीवर चाकूने वार केला होता. तो याच घरात दडलेला होता, असेही त्याने स्पष्ट केले. मात्र, यासंदर्भात पोलिस ठाण्यात माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे पोलिसांच्या तपासाला वेगळी दिशा मिळू शकते. आरोपीच्या जबाबानंतरच वस्तुस्थिती बाहेर येण्याची शक्यता आहे.